तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:30 IST2020-02-09T12:30:44+5:302020-02-09T12:30:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती ...

Blatant decision in the first meeting of the Taloda Panchayat Samiti | तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती व बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयासह इतर धडाकेबाज निर्णय पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत घेतल्याने निश्चितच त्यांचा अशा विकासाच्या व्हिजनाने तालुक्यातील ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अन्यथा ‘नव्याची नवलाई’ अशी म्हण ठरू नये.
तळोदा पंचायत समितीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन पदाधिकारी व अधिकाºयांची पहिलीच मासीक सभा घेण्यात आली. एक-दोन सदस्य वगळता सर्वच सदस्य नवीन आहेत. त्यामुळेते अनुभवी आहेत. त्यातही त्यातील बहुतेक जण तरूण आहेत. साहजिकच त्यांच्या कामगिरीबाबत ग्रामीण जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र या पदाधिकाºयांनी पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली आहे. कारण बैठकीत गतीमान प्रशासनासाठी कर्मचाºयांची बायोमेट्रीक हजेरी, पंचायत समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, ग्रामविकास आराखड्यासाठी अधिकाºयांचा समन्वय, विभाग प्रमुखांची सक्तीची उपस्थिती, कागदी घोड्याऐवजी कामांची प्रत्यक्ष कृती, कामचुकारांवर कारवाई अशा वेगवेगळ्या निर्णयांबरोबरच आदिवासी विकास प्रकल्पांच्या योजनांच्या आढाव्यासाठी तेथील अधिकाºयांना बैठकीस सक्ती करून असे धोरणात्मक विषय घेण्यात आले.
साहजिकच पदाधिकाºयांच्या या निर्णयाने तालुक्यातील ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तथापि त्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे. कारण लाभार्थ्यांना विविध योजनांच्या कामांसाठी सतत हेलपाटे मारावे लागत असल्याचा वाईट अनुभव आहे. कर्मचारी कार्यालयात टेबलावर सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यांना शोधण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याच्या प्रकारालाही तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. आता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीक हजेरी यामुळे निश्चितच कामचुकारपणा दूर होऊन प्रशासनात गतीमानता येवून लोकांची कामे होतील. विशेषत: आदिवासी प्रकल्पाच्या योजना व अधिकाºयांमधील समन्वय यामुळे योजनांना गती येईल.
या सर्व पार्श्वभूमिवर पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाºयांनी घेतलेले हे निर्णय निश्चितच तालुक्याचा विकास आणि प्रशासनातील उदासिनता दूर होण्यासाठी निश्चितच फलदायक आहे. परंतु त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा नव्याची नवलाई अशी आरूढ झालेली म्हण ठरु नये.

Web Title: Blatant decision in the first meeting of the Taloda Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.