नंदुरबारात भाजपाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:11 IST2019-06-14T12:10:59+5:302019-06-14T12:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा भाजपाची बैठक शहरात आयोजित करण्यात आली होती़ लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत ...

नंदुरबारात भाजपाची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा भाजपाची बैठक शहरात आयोजित करण्यात आली होती़ लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन कामकाजाचा आढावा घेण्यात आला़
बैठकीस भाजपाच्या जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, डॉ़ कांतीलाल टाटिया, बाजार समितीचे माजी सभापती व्यंकटराव पाटील, नगरसेवक आनंद माळी, माणिक माळी, प्रकाश चौधरी, अॅड़ उमा चौधरी, हरी दत्तू पाटील, मिलींद मोहिते, नंदुरबार तालुकाध्यक्ष रविंद्र गिरासे, महिला आघाडीच्या सविता जयस्वाल यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े
बैठकीत खासदार डॉ़ हीना गावीत यांनी तालुका निहाय आढावा घेतला़ यानंतर मतदानाबाबत चर्चा करण्यात येऊन कमी मतदान झालेल्या गावांमध्ये पक्षाचे काम करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिका:यांनी विविध योजना आणि अभियान राबवण्यावर चर्चा करण्यात आली़ प्रारंभी खासदार डॉ़ गावीत यांचा सत्कार करण्यात आला़ बैठकीत येत्या काळात आभार सभा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली़
आमदार डॉ़ गावीत यांनीही उपस्थितांसोबत चर्चा करुन आगामी निवडणूक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली़