शहादा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:29 IST2019-10-24T13:29:25+5:302019-10-24T13:29:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभेच्या शहादा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी यांचा विजय झाला़ त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार ...

शहादा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभेच्या शहादा मतदारसंघातून भाजपाचे राजेश पाडवी यांचा विजय झाला़ त्यांनी काँग्रेसचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड़ पद्माकर वळवी यांचा 7 हजार 895 मतांनी पराभव केला़
पोलीस खात्यात पोलीस निरीक्षक या पदावरुन थेट शहादा मतदारसंघात उमेदवारी करणारे राजेश पाडवी हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत़े शहादा मतदारसंघातून त्यांना 94 हजार 405 मते मिळाली़ तर काँग्रसेचे अॅड़ पद्माकर वळवी यांना 86 हजार 510 मते मिळाली़ पहिल्या फेरीपासून मतदारसंघातील चुरस कायम होती़ या चढाओढीत अखेर राजेश पाडवी हे वरचढ ठरल़े मतदारसंघातील तिसरे उमेदवार जेलसिंग पाडवी यांनाही लक्षवेधी मते मिळाली आहेत़