सत्ता स्थापनेमुळे जिल्हाभरात भाजपचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:13 IST2019-11-24T12:13:37+5:302019-11-24T12:13:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सत्तास्थापनेच्या अचानक झालेल्या घडामोडी आणि राजकीय उलथापालथ याची प्रचंड उत्सूकता होती. सोशल मिडियावर ...

सत्ता स्थापनेमुळे जिल्हाभरात भाजपचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सत्तास्थापनेच्या अचानक झालेल्या घडामोडी आणि राजकीय उलथापालथ याची प्रचंड उत्सूकता होती. सोशल मिडियावर देखील विरोध आणि समर्थन यांचा मेसेजचा रतीब लागला होता. भाजपने सत्ता स्थापनेचा जल्लोष केला तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये शांतता होती. दरम्यान, सर्वच राजकीय पक्ष कार्यालयांसमोर पोलीस बंदोबस्त आहे.
गेल्या तीन आठवडय़ापासून सत्ता स्थापनेचा सुरू असलेला घोळ आणि त्या अनुषंगाने शनिवारी सकाळीच झालेल्या नाटय़मय घडामोडींमुळे राजकीय पक्ष कार्यकत्र्यासह नागरिकांची उत्सूकता प्रचंड ताणली गेली होती. सकाळपासूनच ठिकठिकाणी गटागटाने नागरिक याच विषयांवर चर्चा करीत होते.
कुठे जल्लोष तर कुठे हिरमोड
भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आनंद पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून आला. सकाळीच चौकाचौकात फटाके फोडण्यात आले. पक्ष कार्यालयांसमोर जल्लोष करण्यात आला. तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी व पदाधिकारी, कार्यकत्र्यासह जल्लोष केला. नंदुरबार येथे पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, महेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी जुन्या पालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपचे नेते डॉ.रवींद्र चौधरी व पदाधिका:यांनी जल्लोष केला. यावेळी नगरसेवक चारूदत्त कळवणकर, आकाश चौधरी, संदीप चौधरी उपस्थित होते. सत्ता स्थापनेचा शहादा, तळोदा येथे जल्लोष दिसून आला. नंदुरबारातही संमिश्र वातावरण होते. अक्कलकुवा मतदारसंघाला अनेक वर्षानंतर मंत्रीपद मिळणार असल्यामुळे मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दोन दिवसांपासून आनंदात होते. परंतु शनिवारच्या घडामोडीमुळे पदाधिकारी व कार्यकत्र्याचा हिरमोड झाला. अशीच स्थिती नवापूर मतदार संघात देखील दिसून आली.
पक्ष कार्यालयांना बंदोबस्त
सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. भाजप कार्यालयाबाहेर तसेच शिवसेना व इतर लहान मोठय़ा पक्षांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैणात होता.
सोशल वॉर..
सोशल मिडियावर सकाळी दहा वाजेपासूनच सोशल वॉर सुरू होता. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कार्यकत्र्यामधील शाब्दीक युद्ध आणि त्या अनुषंगाने होणारे विनोद, मिम्स आणि काटरून्स यांची सोशल मिडियावर दिवसभर चलती होती.
नंदुरबारात विधानसभेच्या चार जागा आहेत. त्यात दोन जागा काँग्रेस तर दोन जागा भाजपच्या आहेत. भाजपचे दोन्ही आमदार शनिवारी जिल्ह्यात होते. तर काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी.पाडवी हे मुंबई येथे होते. आमदार शिरिष नाईक हे देखील शनिवारी तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
4चारही आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानासमोर देखील बंदोबस्त लावण्यात आला होता.