पाणी व घरपट्टी माफ करण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:54 IST2020-05-17T12:53:54+5:302020-05-17T12:54:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेने स्व:मालकीच्या इमारती ज्या संस्थांना भाडे कराराने दिल्या आहेत त्यांच्याकडील वीजबिलासह थकित करांच्या ...

 BJP's demand for water and housing waiver | पाणी व घरपट्टी माफ करण्याची भाजपची मागणी

पाणी व घरपट्टी माफ करण्याची भाजपची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार नगरपरिषदेने स्व:मालकीच्या इमारती ज्या संस्थांना भाडे कराराने दिल्या आहेत त्यांच्याकडील वीजबिलासह थकित करांच्या रकमा वसुल कराव्या, शहरातील मालमत्ताधारकांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी. यावर निर्णय घेण्यासाठी तातडीने विशेष सभा बोलवावी अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी, विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, प्रतोद आनंदा माळी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना याबाबत पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्याच्या प्रत्येक शहरात व गावागावात आर्थिक संकटाची भीषणता समोर येऊ लागली आहे. शहरातील सर्व करदात्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालिकेची सभा बोलवावी आणि मालमत्ताधारकांना कर माफी देण्याचा ठराव करण्यात यावा. याशिवाय पालिकेच्या स्व:मालकीच्या इंदिरा मंगल कार्यालय, सीबी गार्डन, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल व अन्य इमारती विविध संस्थांना भाडेकरारावर देऊन ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासूनची विज बिले आणि मालमत्ता करासह विविध रकमांची थकबाकी आहे. ती वसूल केल्यास १० कोटी रुपये उत्पन्न नगर परिषदेकडे जमा होऊ शकते. म्हणून ती रक्कम नगरपालिकेने ताबडतोब वसूल करावी आणि कोरोना मुळे ऊद्भवलेल्या स्थितीच्या पाशर््वभूमीवर शहरातील सर्व मालमत्ताधारकांना घरपट्टी पाणीपट्टी सह विविध कर माफी देऊन त्यांची रक्कम या १० कोटी रुपयातून अदा करण्यात याव्या. त्यासाठी सभा बोलावून ठरावाद्वारे निर्णय करावा. कर्मचारी आणि पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांना नगरपरिषदेकडून प्रोत्साहन भत्ता अदा केला जावा. यासह इतर विषयांवर चर्चेसाठी तातडीने पालिकेची विशेष सभा बोलवावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.

Web Title:  BJP's demand for water and housing waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.