नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:18 PM2018-02-22T13:18:48+5:302018-02-22T13:18:48+5:30

नगराध्यक्षांना दिले निवेदन

BJP's demand for municipal funding: Nandurbar Palika | नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका

नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : पालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवक निधी म्हणून दरवर्षी दहा लाख रुपये निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.
याबाबत नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात पालिकेतील भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर व इतर नगरसेवकांनी म्हटले आहे की, पालिकेच्या अर्थसंकल्पात विरोधी नगरसेवकांच्या मागण्यांचाही विचार करण्यात यावा. त्यात नगरसेवक निधी म्हणून दरवर्षी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी. कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी निर्बजीकरण करून व कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणून दहा लाख रुपयांची तरतूद करावी. मोकाट जनावरांसाठी पालिकेमार्फत गौशाळा व तेथेच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करून निधीची तरतूद करावी. पालिकेच्या संदर्भातील तक्रारींसाठी मोबाईल अॅप सुरू करून त्यासाठी तरतूद करावी. 
रहदारीच्या समस्येवर उपाययोजनेसाठी श्रॉफ विद्यालय, डी.आर.विद्यालय, धुळे चौफुली, हाट दरवाजा या आवश्यक ठिकाणी सिगAल यंत्रणा उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी. शहर बस वाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार करून निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
निवेदनावर विरोधी अर्थात भाजप गटातील सर्व नगरसेवकांच्या सह्या आहेत.    
 

Web Title: BJP's demand for municipal funding: Nandurbar Palika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.