काँग्रेसच्या रणनितीवर भाजपचीही ‘क्रॉसचेकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:48 IST2018-10-07T12:48:14+5:302018-10-07T12:48:19+5:30

राजकारणाचा नवा डाव : पक्षविरोधी नेत्यांना भेटीच्या सत्राने जनतेत चर्चेला उत

BJP's 'Cross Checking' on Congress's Strategy | काँग्रेसच्या रणनितीवर भाजपचीही ‘क्रॉसचेकिंग’

काँग्रेसच्या रणनितीवर भाजपचीही ‘क्रॉसचेकिंग’

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा नव्याने डावपेच खेळले जात असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेते परस्पर विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन लोकांना नवीन चर्चा चघळण्याची संधी देत आह़े काँग्रेसचा संघर्ष यात्रेत भाजपच्या स्थानिक कार्यकत्र्यानी काँग्रेसच्या कामकाजाविरोधातच तक्रार देण्याचा डाव आखल्याने भाजपतर्फेही ‘क्रॉसचेकींग’ची रणनिती आखली जात असल्याचे बोलले जात आह़े
नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीपासून जिल्ह्याचे राजकारण नेहमीच एकमेकांचा विरोधी पक्षातील नेत्यांच्या हितसंबंधाने चर्चेत राहिले आह़े त्यामुळे सत्ता कुठल्याही पक्षाची असो, विरोधी पक्षातील नेते आपआपले हितसंबंधातून स्थानिक परिस्थितीवर पकड ठेवण्याचे डावपेच खेळत आले आह़े त्यातूनच कुणाला मंत्री करा, कुणाला कुठले खाते देऊ नका याची ‘लॉबिंग’ही बांधली जात़े त्या-त्या वेळी हे सर्व विषय चर्चेत राहिलेच आह़े आता नंदुरबार पालिका निवडणुकी नंतर पुन्हा नवे डावपेच सुरु झाल्याचे चित्र आह़े नंदुरबार पालिकेची निवडणूक राजकीयदृष्टया काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती़ त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड व्यक्तीव्देषाचे राजकारण पहायला मिळाल़े याच निवडणुकीसाठी स्वत:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी आले असता, त्यांनी नंदुरबार पालिकेतील गैरव्यवहाराबाबत आरोप करुन पालिका सत्ताधा:यांना अनेक खडे बोल सुनावले होत़े 
मुख्यमंत्र्यांच्या तेव्हाच्या आक्रमकतेवर भाजप कार्यकत्र्याना प्रचंड जोश आला होता़ परंतु निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पुत्राच्या लगAसमारंभात आवजरुन शुभेच्छा देण्यासाठी आले होत़े त्यावेळी राजकारणात वेगळ्या चर्चा रंगल्या़ काही राजकारणींनी तर त्याचे संबंध थेट पक्षप्रवेशाशी जोडले होत़े मात्र अफवा अफवाच राहिली़ आता पुन्हा 10 दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार पालिकेचे नगराध्यक्षांसह काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटल़े या भेटीनेतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगवल्या़ ही चर्चा शमत नाही तोच भाजपनेही काँग्रेसचा संघर्ष यात्रेची संधी साधून काँग्रेसप्रमाणेच ‘क्रॉसचेकींग’ची रणनिती खेळण्याचा प्रयत्न केला़ या संघर्ष यात्रेत आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसचा विरोधातील अर्थातच नंदुरबार पालिकेतील 200 कोटी रुपयांच्या कामांबद्दल तक्रारीचे निवेदन देण्याचे नियोजन केले होत़े त्यासंदर्भात पालिकेतील एका विरोधी नेत्याने सोशल मीडियाव्दारे त्यांच्याशी संपर्क साधून वेळही मागितली़ अर्थातच स्थानिक राजकारण आणि तांत्रिक अडचण पुढे करत ही भेट झाली नाही़ परंतु मुंबईला भेटीसाठी बोलवले असून तेथे जाऊन भाजपचे सदस्य हे निवेदन त्यांना देणार असल्याचे एका सदस्याने याबाबत सांगितल़े 
एकूणच काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात सध्या ‘क्रॉसचेकींग’चे राजकारण सुरु झाले असून लोकांना आता तो नवीन चर्चेचा विषय मिळाला आह़े या चर्चाची वास्तव स्थितीशी संबंध नसतो, हे जरी वास्तव असले तरी चर्चेतून मात्र राजकारणातील मुरब्बी नेते आपले राजकारणाचे डावपेच आखत असतात, हे देखील तेवढेच स्पष्ट आह़े
 

Web Title: BJP's 'Cross Checking' on Congress's Strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.