ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:30+5:302021-06-27T04:20:30+5:30

भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर ...

BJP's Chakka Jam agitation for reservation of OBCs | ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलन

भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर नवीन पोलीस ठाण्यासमोरील चौफुलीवर हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यात हे आंदोलन केले. या तीनचाकी सरकारमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालविण्यात आले. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहादा तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील लोकांचा सहभाग होता. आंदोलन यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील व ईश्वर पाटील, शहर अध्यक्ष विनोद जैन, तालुका प्रभारी जितेंद्र जमदाडे, जि.प.चे माजी सदस्य धनराज पाटील, मयूर पाटील, अनिल भामरे, किन्नरी सोनार, अनामिका चौधरी, पंकज सोनार, हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, लक्ष्मीकांत वसावे, किसान मोर्चाचे डॉ. किशोर पाटील, श्रीराम पाटील, योगेश पाटील, सुनील चव्हाण, अभय संचेती, कल्पना पंड्या, नंदा सोनवणे, भावना लोहार, कविता पाटील, मीनाक्षी पाटील, संगीता पाठक, वंदना भावसार, जयेश देसाई, सचिन देवरे, रमाशंकर माळी, शरद पाटील, राजीव देसाई, तेजस सराफ, लव्ह लोहार, गणेश पाटील, झुलाल मालचे, दंगल सोनवणे, मनोज वाडिले, मयूर बाविस्कर, योगेश डामरे, मोहन सोनार, रिषभ जैन, रोशन कोठारी, पुसनदचे माजी सरपंच, कार्तिक नाईक, नितीन कोळी, सागर मराठे, विशाल पाटील, मयूर मराठे, महेश बोरसे, बाबा पानपाटील, नितीन जगदाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Web Title: BJP's Chakka Jam agitation for reservation of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.