नंदुरबारात भाजप महायुतीची प्रचार रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:44 IST2019-04-27T20:43:48+5:302019-04-27T20:44:12+5:30
वडाळी, सारंगखेड्यात सभा : विजयकुमार गावीत यांचे मार्गदर्शन

नंदुरबारात भाजप महायुतीची प्रचार रॅली
नंदुरबार : भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांची शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. महायुतीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सारंगखेडा, वडाळी येथे सकाळी त्यांनी प्रचार सभा घेतल्या.
नंदुरबारातील मोठा मारुती मंदीरापासून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. स्वत: उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, भाजपचे डॉ.रवींद्र चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, पुखराज जैन, देवेंद्र जैन, रवींद्र गिरासे, पृथ्वीराज जैन, जेठमल अंबाणी, महिला आघाडीच्या अॅड.उमा चौधरी, नगरसेवक चारूदत्त कळवणकर आदींसह नगरसेवक व भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध भागातून रॅली फिरवण्यात आली. मतदारांशी संवाद साधरण्यात आला.
शुक्रवारी सकाळी सारंगखेडा व वडाळी येथे प्रचार सभा घेण्यात आली. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच डॉ.हिना गावीत यांनी केलेल्या विकास कामांचा लेखा जोखा डॉ.गावीत यांनी मांडला. तापी योजनेचे पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी निधी आणला, गॅसचे वाटप असेल, दुर्गम भागात मोबाईल टॉवर आणले, जिल्ह्यात सात मार्गांना मंजुरी आणली व ती लवकरच पूर्ण करू, राज्य मार्गाचे राष्टÑीय मार्ग म्हणून मंजुरी मिळवून दिली. जिल्ह्याचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावू, नर्मदेचे पाणी बोगद्याद्वारे तापी नदीत टाकण्याचा प्रस्ताव केला. परंतु काँग्रेसने त्याला विरोध केला. शेतीला सुरळीत वीज पुरवठा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य अभिजीत पाटील, जयपाल रावल, पृथ्वीराज रावल, गिरीश जगताप, किशोर पाटील, नारायण सामुद्रे, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.