महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे महावितरणला टाळे ठोक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:49+5:302021-02-06T04:58:49+5:30

महावितरणकडून राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या प्रकाराचा भाजपकडून राज्यस्तरावर निषेध करण्यात आला. ...

BJP's blockade of MSEDCL against the alliance government | महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे महावितरणला टाळे ठोक आंदोलन

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे महावितरणला टाळे ठोक आंदोलन

महावितरणकडून राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या प्रकाराचा भाजपकडून राज्यस्तरावर निषेध करण्यात आला. यांतर्गत नवापूर शहर व विसरवाडी येथे महावितरण केंद्रांवर टाळेठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत असताना सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांनी कुलप ताब्यात घेतले. यावेळी भारतीय जनता पाटीचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, जिल्हासरचिटनीस राजेंद्र गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, आदिवासी आघाडीचे प्रदेश चिटणीस अनिल वसावे, नगरसेवक महेंद्र दुसाने, माजी नगरसेवक रमला राणा, जैनु गावीत, अजय गावीत, तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, जाकीर पठाण, हेमंत जाधव, जितेंद्र अहिरे, सप्नील मिस्त्री, दिनेश चौधरी, कमलेश छत्रीवाला, भिमसिंग पाडवी, सुनिल पाडवी, जहुरखान पठाण, घनशाम परमार, शाहुरख खाटीक, सैफ व्होरा, अलारखा शहा, सौरव सोनार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: BJP's blockade of MSEDCL against the alliance government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.