वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:41 IST2020-11-24T13:41:17+5:302020-11-24T13:41:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे वीज बिलविरोधात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी बिलांची होळी करण्यात आली. ...

वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे वीज बिलविरोधात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी बिलांची होळी करण्यात आली.
नंदुरबार येथील आंदोलनाप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीम सिंग राजपूत, जिल्हा सचिव युवा मोर्चा अश्विन सोनार व मयुरी चौधरी, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर आदी उपस्थित होते.
शहादा येथे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, नगरसेवक संजय साठे, शहर अध्यक्ष विनोद जैन, माजी जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष जितेंद्र जमदाडे, हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, उपाध्यक्ष पंकज सोनार, गौरव जैन, जिल्हा महिला अध्यक्ष किन्नरी सोनार, युवा मोर्च शहर अध्यक्ष राजीव देसाई, वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ.राकेश पाटील, तालुका म.मोर्चा अध्यक्ष प्रतिभा पवार, रोहिनी भावसार, यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी उपस्थित होते.
नवापूर येथे तालुकाध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव अनिल वसावे यांच्या नेतृत्वाखाली विजवितरण कार्यालया समोर घोषणा बाजी करुन वाढीव विजबिलांची होळी करण्यात आली.