शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

भाजपला गट-तट सांभाळण्याची तर काँग्रेसची अस्तित्वाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:19 PM

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व असते यंदा दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे असल्याने त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी प्रवेश घेतल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी सर्व गट-तट संभाळून निवडणुकांना सामोरे जावे लागेल. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपल्या गतवेळच्या जागा टिकवण्याचे खडतर आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांसोबत मोठे राजकीय नेतृत्व नसल्याची स्थिती आहे.जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट शहादा तालुक्यात आहे. परिणामी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शहादा तालुक्यातून दिला जाण्याचा प्रघात पडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथ घडामोडी मान-अपमान नाट्य रंगल्यानंतर सर्वच पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तालुक्यात आमदार डॉ.विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी हे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पद्माकर वळवी उमेदवारी करताना अनेक कार्यकर्त्यांसह एकाकी झुंज दिल्याने काँग्रेससमोर कार्यकर्त्यांची वानवा असल्याचे सिद्ध झाले. अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता काँग्रेस पक्षासोबत राहिली. ते टिकवण्यासह गतकाळाच्या आठ जागा टिकविण्याचे खडतर आव्हान काँग्रेससमोर आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील हे गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडून आले होते. मात्र त्यानंतर तीन वर्षांपूर्वी झालेल्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत व तद्नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. आता ते नेमक्या कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार, कुठली भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसतर्फे ते विजयी झाले असले तरी तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहणे पसंत केले व भाजपाशी जवळीक केली. आता कुठल्या पक्षातर्फे लढविणार याबाबत चर्चा सुरू आहे.भारतीय जनता पक्षाने यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याचे घोषित केले सर्वाधिक स्पर्धा उमेदवारीसाठी येथे असेल. राज्यात महाविकास आघाडीचा फामूर्ला जिल्ह्यात लागू झाल्यास भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. ओबीसीच्या चार जागांसाठी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी झाल्यास या आघाडीतील तिन्ही पक्षांना उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागेल. संभाव्य बंडखोरांना थोपविण्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपला राजकीय अनुभव लावावा लागेल. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शिवसेननाही आशावादी आहे.मातब्बरांची चॉईस ठरणार डोकेदुखीपंचायत समिती २८ गण असून येथे स्पर्धा कमी असली तरी अनेक मातब्बरांना चॉईस च्या मतदारसंघासाठी आतापासूनच दावेदारी केल्याने सर्वच पक्षांसोबत डोकेदुखी ठरली आहे.संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हानतालुक्याच्या ग्रामीण भागातील कारभाराच्या दृष्टीने पंचायत समितीवर सत्ता आवश्यक असते. यासाठी सर्वच पक्षांना उमेदवार जाहीर करताना संभाव्य बंडखोरी संपवावी लागणार आहे.भाजप एका जागेवर झाली विजयीगत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तेरा जागांपैकी सर्वाधिक आठ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजय झाला होता.काँग्रेसला जागा टिकविण्याचे आव्हानयंदा गट संख्या एकने वाढून १४ झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला हे चित्र बदलण्यासाठी कसरत करावी लागेल तर काँग्रेससमोर आपल्या जागा टिकविण्याचे आव्हान असणार आहे.गत पंचायत समिती निवडणुकीत २६ जागांपैकी सर्वाधिक १३ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एकमेव सदस्यांनी पाठिंबा दिल्याने पहिले अडीच वर्ष काँग्रेसकडे सभापतीपद व भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे उपसभापती पद होते. मात्र त्यानंतरच्या काळात बºयाच राजकीय घडामोडी घडल्याने पंचायत समितीत सत्तांतर नाट्य घडले व त्यानंतरच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होते.