सभागृहातील जागेवरून भाजप नगरसेवकांचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:25 IST2020-11-09T12:25:25+5:302020-11-09T12:25:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी नगरसेवकांचा उल्लेख नाही, बसण्यासाठी खुर्ची नाही असे सांगत ...

BJP corporator's argument from the seat in the assembly | सभागृहातील जागेवरून भाजप नगरसेवकांचा वाद

सभागृहातील जागेवरून भाजप नगरसेवकांचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विरोधी नगरसेवकांचा उल्लेख नाही, बसण्यासाठी खुर्ची नाही असे सांगत भाजप नगरसेवकांनी कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. यावेळी घोषणा, प्रतीघोषणा झाल्याने काही काळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. जिल्हाधिकारी यांनी विरोधी नगरसेवकांना समजवून सांगितले. त्यानंतर त्यांनी बहिष्कार टाकून तेथून निघून गेले. 
पालिकेच्या विकास कामांच्या भुमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन झाला. त्यासाठी नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची निर्धारीत वेळेच्या नंतर भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर, नगरसेवक कमल ठाकुर, प्रसाद चौधरी, गौरव चौधरी, आनंद माळी व इतर सभागृहात आले. तोपर्यत सर्व आसन भरले गेले होते. त्यावर आक्षेप घेत कळवणकर यांनी आक्षेप घेतला. चंद्रकांत रघुवंशी यांनी कोरोनाची खबरदारी घेत आसनक्षमता पुर्ण झाली आहे. आपल्याला आसन खाली करून देत आहोत तेथे आपण बसावे असे सांगितले, परंतु विरोधी नगरसेवकांनी जोरजोराने आक्षेप घेणे चालूच ठेवले. त्यावरून रघुवंशी व त्यांच्यात    शाब्दीक वाद झाले. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घोषणा सुरू झाल्या. 
जिल्हाधिकारी भारूड यांनी नगरसेवकांना समजविण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी माईकवर येऊन हा शासकीय कार्यक्रम आहे. कुणी ऐकत नसल्यास पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे आपले काम करावे अशा सुचना केल्या. त्यानंतर विरोधी नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला व तेथून निघून गेले. त्यानंतर नाट्यगृह परिसरात नगरसेवकांनी घरपट्टी माफ करण्याचे बॅनर झळकवून निषेध व्यक्त केला. 

Web Title: BJP corporator's argument from the seat in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.