कोठडा गावाजवळील बायो डिझेल पंप दुसऱ्यांदा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:11 IST2020-08-07T13:11:22+5:302020-08-07T13:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महामार्गावरील शहरानजीक कोठडा शिवारातील त्या बायो डिझेल पंपला दुसऱ्यांदा सील करण्यात आले. नवापूर तालुक्यातील ...

कोठडा गावाजवळील बायो डिझेल पंप दुसऱ्यांदा सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : महामार्गावरील शहरानजीक कोठडा शिवारातील त्या बायो डिझेल पंपला दुसऱ्यांदा सील करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील कोठडा शिवारात असलेले एक बायो डिझेल पंप ना हरकत दाखला नसताना सर्रास सुरू असल्याचे निदर्शनात आल्यावर २६ जुलै रोजी नवापूर तहसीलदार सुनीता जºहाड यांनी नंदुरबार जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तपासणीअंती सील केले होते. या कारवाईनंतर दोनच दिवसात त्या पंप मालकाने ना हरकत दाखला सादर केल्याने तो पंप सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. पंप सील करताना ना हरकत दाखले नव्हते व दोनच दिवसात नाहरकत दाखले सादर झाल्याने या प्रकारावर प्रसार माध्यमातून टीकेची झोड उठली होती.
नंदुरबार जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी झाल्यानंतर सादर केलेल्या ना हरकत दाखल्याची पडताळणी केली असता कार्यालयात आवश्यक असलेले कागदपत्र न आढळल्याने पुन्हा जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने तहसीलदार सुनिता जºहाड व संबंधित पंप मालकाच्या उपस्थितीत नवापूर मंडळ अधिकाºयांनी त्या पंपाच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षात विद्युत साहित्य सील केले.
प्रशासनाकडून सहानिशा न करताच सील केलेले पंप घाई घाईने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पुन्हा सील करण्याची कारवाईची वेळ प्रशासनावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.