दुचाकींचा धक्का लागल्याने शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:03 IST2019-08-18T12:03:14+5:302019-08-18T12:03:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून एकास जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली. पोलिसात अॅट्रासिटीअंतर्गत ...

Bike due to two-wheeler shock | दुचाकींचा धक्का लागल्याने शिविगाळ

दुचाकींचा धक्का लागल्याने शिविगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून एकास जातीवाचक शिविगाळ केल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली. पोलिसात अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अकिल उर्फ विक्की आदिल अहमद फकिर मोहमंद मक्राणी, रा.इंदिरानगर, अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. वैभव उर्फ विक्की राज खरात हा आपल्या दुचाकीने जात असतांना समोरून आलेल्या मक्राणी याने त्याला शिविगाळ करून गाडी रोखण्याचे सांगितले. काहीही कारण नसतांना त्याला जातीवाचक शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबत खरात यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 
 

Web Title: Bike due to two-wheeler shock