बिबटय़ाने प्रतापपूरात घोडा केला फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:10 IST2019-11-02T13:10:39+5:302019-11-02T13:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर :तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार झाला़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ ...

बिबटय़ाने प्रतापपूरात घोडा केला फस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रतापपूर :तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार झाला़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भिती व्यक्त होत आह़े
तळोदा तालुक्यातील डोंगराळ भागातील जंगलातून प्रतापपूर भागात नेहमीच बिबटय़ा येत आहे. या भागात त्यांचा नेहमीच वावर राहत असल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्याना देखील धोका निर्माण झाला आहे. ब:याचवेळा या भागातील नागतरिकांनी बिबटय़ाला हुसकावून लावले, परंतु बिबटय़ा पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे तेथील शेतमजरांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक कापणीचा हंगाम असल्याने शेतमजूर शेती कामांकडे पुन्हा पाठ फिरवू लागले आहे.
असे असतानाच प्रतापपूर येथील गुलाब पाटील यांच्या खळ्यातील छोटय़ा मालसिंग पावरा यांचा घोडय़ावर बिबटय़ाने हल्ला केला असून त्यात घोडा ठार झाला आहे. या घटनेबाबत वनविभागाच्या अधिका:यांशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी वनपाल एन.पी.पाटील, वनरक्षक एल.टी. पावरा, अमिम पाडवी, आर.एम.पावरा यांनी उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीत मयत घोडय़ाचा पंचनामा करण्यात आला.