पिंप्राणी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:30+5:302021-05-28T04:23:30+5:30
यावेळी जिल्हा परिषद सदस्या रजनी नाईक, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुरेश नाईक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सत्येन ...

पिंप्राणी येथे रस्ता कामाचे भूमिपूजन
यावेळी जिल्हा परिषद सदस्या रजनी नाईक, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुरेश नाईक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सत्येन वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मणिलाल शेल्टे, डॉ जाधव ठाकरे, सरपंच करणसिंग रावताळे, माजी प स सदस्य भाईदास बागले, उपसरपंच कालुसिंग चौधरी, सखाराम मोते, ॲड राजेंद्र ठाकरे, विस्तार अधिकारी धिरसिंग वळवी, मुख्याध्यापक अशोक पानपाटील, ग्रामसेविका संगीता नाईक, तलाठी सोनाली सोनवणे उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत पिंप्राणी गावातील स्मशानभूमी कडेे जाणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन जि.प. अध्यक्षा ॲड सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थित गावात कोविड प्रतिबंधक लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी लसीकरण केंद्रावर गावातील ५५ महिला व पुरुषांना लक्ष देण्यात आली.