पिंप्राणी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:46+5:302021-02-05T08:11:46+5:30
कार्यक्रमास माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प. सदस्या सदस्या रजनी नाईक, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, पं.स. सदस्य ...

पिंप्राणी आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन
कार्यक्रमास माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जि.प. सदस्या सदस्या रजनी नाईक, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, पं.स. सदस्य सत्येन वळवी, डॉ.जाधव ठाकरे, सरपंच करणसिंग रावताळे, उपसरपंच कालूसिंग चौधरी, उदेसिंग चौधरी, काशीराम चौधरी, कालूसिंग पाडवी, दला चौधरी, लाला धनगर, डॉ.केशव पावरा, लखन नाईक, ॲड.राजेंद्र ठाकरे, दिलीप ठाकरे, ओंकार पटले, तारसिंग ठाकरे आदी उपस्थित होते. या वेळी ॲड. सीमा वळवी म्हणाल्या की, आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा आहे. याच हेतूने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी वारंवार पाठपुरावा करून गावात आरोग्य उपकेंद्राची मंजुरी मिळवली. दोन महिन्यांच्या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल व लवकरच केंद्रामध्ये कर्मचारी उपलब्ध होऊन आरोग्य सेवेचा लाभ गावकऱ्यांना होईल, असे सांगितले. ॲड.पद्माकर वळवी म्हणाले की, आदिवासी विभागामार्फत नर्सरीची योजना सुरू करणार असल्याने परिसरातील ज्या नागरिकांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी यादी संबंधिताकडे जमा करावी, असे आवाहन करून त्यांनी अनेक शासकीय योजनांची माहिती दिली. डॉ.सुरेश नाईक यांनीही कामाची व योजनांची माहिती दिली. अनिल कुवर व ॲड. राजेंद्र ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. आभार डॉ.जाधव यांनी मानले.