शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीपात्रात बंधाऱ्यांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यामध्ये करण्यात आला असून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यामध्ये करण्यात आला असून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या उपाययोजना म्हणून फेजर गेट चेक डॅम बंधारे बांधकामास गोमाई नदीपात्रात सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी तालुक्यातील सात फेजर गेट चेक डॅम बंधाऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.राज्य शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत जलसंधारण विभागामार्फत शहादा तालुक्यात २० फेजर गेट चेक डॅम बंधाºयाच्या कामांना मंजुरी दिली असून यासाठी सुमारे १८ कोटी ७४ लाख ५९ हजार २५७ रुपये निधी मंजूर केला आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या बांधकामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील गोमाई नदीपात्रातील मलोणी, लोणखेडा, भागापूर, गोगापूर क्रमांक एक व दोन, जवखेडे, श्रीखेड या सात ठिकाणे बंधारे बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आठ कोटी १९ लाख ३० हजार १०३ रुपये निधी मंजूर केला आहे. या बंधाºयामुळे शहादा शहरासह सात गावातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. दुसºया टप्प्यात उर्वरित १३ बंधाºयांचे बांंधकाम करण्यात येणार आहे. हे २० बंधारे पूर्ण क्षमतेने तयार झाल्यास यात निर्माण होणाºया जलसाठ्यामुळे तालुक्यातील सुमारे ३४२ हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे ओलिताखाली येणार असल्याने त्याचा लाभ परिसरातील नागरिकांसह शेतकºयांना होणार आहे.सुमारे पाच मीटर उंचीचे व ११० मीटर लांबीचे हे बंधारे असणार असून यात साधारणत: नदीपात्रात ७०० सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असणार आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात ५०० ते ७०० मीटरपर्यंत जलसाठा असणार आहे. पाणी अडवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच प्लास्टिकच्या फळ्या वापरल्या जाणार आहेत. या बंधाºयामुळे पावसाळ्यात नदीला येणाºया पुराचे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होणार असून उन्हाळ्यातही नदीपात्रात जलसाठा राहणार असल्याने सिंचनाच्या दृष्टीकोनातून हे बंधारे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.या वेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जलसंधारण अधिकारी रमेश गावीत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश पाटील, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळस, तेजस राहाणे, राकेश पावरा, गणेश पाटील, क्षेत्रीय अभियंता शैलेश अहिरे, पुष्पराज पाटील, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, पं.स. सदस्य गणेश पाटील, डॉ.किशोर पाटील, सुनील चव्हाण, अविनाश मुसळदे, कृषीभूषण हिरालाल पाटील, अतुल जयस्वाल, योगेश पाटील, विरसिंग पाडवी, नारायण ठाकरे, डॉ.विजय चौधरी, गणेश पाटील, गोविंद पटले, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, निलेश मराठे, जयेश देसाई, कमलेश जांगीड, रमाशंकर माळी, वैभव सोनार, गुड्डू वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनाच्या जलसंधारण महामंडळाने नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्हा म्हणून केला आहे. विशेष उपक्रम म्हणून किमान १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या फेजर गेट चेक डॅम बंधाºयांना महामंडळाने मंजुरी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात २०, नंदुरबार तालुक्यात १७, धडगाव तालुक्यात सात व नवापूर तालुक्यात १७ असे एकूण ६१ फेजर गेट चेक डॅम बंधारे जिल्ह्यातील विविध नदीपात्रात बांधले जाणार आहेत. यासाठी महामंडळाने सुमारे ५२ कोटी ८७ लाख ४७ हजार ९२३ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पहिल्या टप्प्यात शहादा तालुक्यातून या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे पाणी अडविणे सहजरित्या शक्य होणार आहे. यामुळे परिसरातील भूगर्भातील जलपातळी वाढणार असून काही ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध राहणार आहे. आधुनिक पद्धतीने या बंधाºयांची निर्मिती करण्यात येणार असल्याने याचा लाभ शहादा शहरासह तालुक्यातील अनेक गावांना होणार आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले असून दुसºया टप्प्यातील मंजूर कामे लवकरच सुरु केले जातील.-राजेश पाडवी, आमदार. गोमाई नदीपात्रात बंधाºयांचे भूमिपूजन