गोमाई नदीपात्रात बंधाऱ्यांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:32 IST2020-06-13T12:32:26+5:302020-06-13T12:32:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यामध्ये करण्यात आला असून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या ...

Bhumipujan of dams in Gomai river basin | गोमाई नदीपात्रात बंधाऱ्यांचे भूमिपूजन

गोमाई नदीपात्रात बंधाऱ्यांचे भूमिपूजन


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यामध्ये करण्यात आला असून जिल्ह्यातील जलसंधारणाच्या उपाययोजना म्हणून फेजर गेट चेक डॅम बंधारे बांधकामास गोमाई नदीपात्रात सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी तालुक्यातील सात फेजर गेट चेक डॅम बंधाऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत जलसंधारण विभागामार्फत शहादा तालुक्यात २० फेजर गेट चेक डॅम बंधाºयाच्या कामांना मंजुरी दिली असून यासाठी सुमारे १८ कोटी ७४ लाख ५९ हजार २५७ रुपये निधी मंजूर केला आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या बांधकामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील गोमाई नदीपात्रातील मलोणी, लोणखेडा, भागापूर, गोगापूर क्रमांक एक व दोन, जवखेडे, श्रीखेड या सात ठिकाणे बंधारे बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आठ कोटी १९ लाख ३० हजार १०३ रुपये निधी मंजूर केला आहे. या बंधाºयामुळे शहादा शहरासह सात गावातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. दुसºया टप्प्यात उर्वरित १३ बंधाºयांचे बांंधकाम करण्यात येणार आहे. हे २० बंधारे पूर्ण क्षमतेने तयार झाल्यास यात निर्माण होणाºया जलसाठ्यामुळे तालुक्यातील सुमारे ३४२ हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे ओलिताखाली येणार असल्याने त्याचा लाभ परिसरातील नागरिकांसह शेतकºयांना होणार आहे.
सुमारे पाच मीटर उंचीचे व ११० मीटर लांबीचे हे बंधारे असणार असून यात साधारणत: नदीपात्रात ७०० सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असणार आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात ५०० ते ७०० मीटरपर्यंत जलसाठा असणार आहे. पाणी अडवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच प्लास्टिकच्या फळ्या वापरल्या जाणार आहेत. या बंधाºयामुळे पावसाळ्यात नदीला येणाºया पुराचे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होणार असून उन्हाळ्यातही नदीपात्रात जलसाठा राहणार असल्याने सिंचनाच्या दृष्टीकोनातून हे बंधारे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या वेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जलसंधारण अधिकारी रमेश गावीत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश पाटील, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळस, तेजस राहाणे, राकेश पावरा, गणेश पाटील, क्षेत्रीय अभियंता शैलेश अहिरे, पुष्पराज पाटील, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, पं.स. सदस्य गणेश पाटील, डॉ.किशोर पाटील, सुनील चव्हाण, अविनाश मुसळदे, कृषीभूषण हिरालाल पाटील, अतुल जयस्वाल, योगेश पाटील, विरसिंग पाडवी, नारायण ठाकरे, डॉ.विजय चौधरी, गणेश पाटील, गोविंद पटले, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, निलेश मराठे, जयेश देसाई, कमलेश जांगीड, रमाशंकर माळी, वैभव सोनार, गुड्डू वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनाच्या जलसंधारण महामंडळाने नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्हा म्हणून केला आहे. विशेष उपक्रम म्हणून किमान १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या फेजर गेट चेक डॅम बंधाºयांना महामंडळाने मंजुरी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात २०, नंदुरबार तालुक्यात १७, धडगाव तालुक्यात सात व नवापूर तालुक्यात १७ असे एकूण ६१ फेजर गेट चेक डॅम बंधारे जिल्ह्यातील विविध नदीपात्रात बांधले जाणार आहेत. यासाठी महामंडळाने सुमारे ५२ कोटी ८७ लाख ४७ हजार ९२३ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पहिल्या टप्प्यात शहादा तालुक्यातून या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे पाणी अडविणे सहजरित्या शक्य होणार आहे. यामुळे परिसरातील भूगर्भातील जलपातळी वाढणार असून काही ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध राहणार आहे. आधुनिक पद्धतीने या बंधाºयांची निर्मिती करण्यात येणार असल्याने याचा लाभ शहादा शहरासह तालुक्यातील अनेक गावांना होणार आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले असून दुसºया टप्प्यातील मंजूर कामे लवकरच सुरु केले जातील.
-राजेश पाडवी, आमदार. गोमाई नदीपात्रात बंधाºयांचे भूमिपूजन 


 

Web Title: Bhumipujan of dams in Gomai river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.