बारी येथे अंगणवाडी व रस्ता कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:49+5:302021-03-24T04:28:49+5:30

आदिवासी उपयोजनेंतर्गत बारी येथे अंगणवाडीची नऊ लाख ४० हजार खर्चाची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात दोन लाख २५ हजार ...

Bhumipujan of Anganwadi and road works at Bari | बारी येथे अंगणवाडी व रस्ता कामाचे भूमिपूजन

बारी येथे अंगणवाडी व रस्ता कामाचे भूमिपूजन

आदिवासी उपयोजनेंतर्गत बारी येथे अंगणवाडीची नऊ लाख ४० हजार खर्चाची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात दोन लाख २५ हजार रूपये महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार होमी योजनेंतर्गत मिळणार आहेत. तसेच रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम आमदारांच्या स्थानिक विकास निधींतून भवरे अंतर्गत बारी येथील दोन रस्ते व तिखळीफळी येथील दोन रस्ते असे एकूण चार कॉक्रिटीकरण रस्ते तयार करण्यात येणार आहे.

तसेच तंटामुक्त योजनेअंतर्गत १० के.व्ही. जनरेटर बारी याठिकाणी घेण्यात आला आहे. जर एखादया वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यास गावात पाण्याची असुविधा निर्माण होणार नाही. या वेळी सभापती रतिलाल कोकणी, तालुका काँग्रेस अध्यक्ष जालमसिंग गावीत, पंचायत समिती सदस्य प्रियंका गावीत, भवरेचे सरपंच प्रभु कोकणी, बारी उपसरपंच विजू कोकणी, शरद मावची, बिलमांजरेचे उपसरपंच राहुल गावीत, बारी येथील माजी सरपंच, फुलजी कोकणी, सुबन कोकणी, प्रकाश कोकणी, सुभाष कोकणी, ठाकुर मावची, गिऱ्या नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of Anganwadi and road works at Bari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.