सिसा येथे वनार्थ रोपवाटिकाचे भूमिपूजन व मशरूम शेती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:08+5:302021-02-09T04:34:08+5:30
वाण्याविहीर : धडगाव तालुक्यातील सिसा वनार्थ बहुउद्देशीय संस्थेद्वारे मशरूम शेतीवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक ...

सिसा येथे वनार्थ रोपवाटिकाचे भूमिपूजन व मशरूम शेती कार्यशाळा
वाण्याविहीर : धडगाव तालुक्यातील सिसा वनार्थ बहुउद्देशीय संस्थेद्वारे मशरूम शेतीवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांचे हस्ते रोपवाटिकेचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भारतीय किसान सेनाचे महासचिव पंडित तडवी उपस्थित होते.
या वेळी राजेंद्र वसावे व जलसिंग वळवी यांनी ऑईस्टर मशरूमबद्दल सविस्तर माहिती देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी त्यांनी उत्पादन प्रक्रिया, हाताळणी, पीक काढणी पद्धत, बाजारपेठ, मशरूमचे आरोग्याला होणारे फायदे आदीं बाबींवर सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेस सिसा गावा व्यतिरिक्त कालिबेल, मनवाणी, काकरपाटी, धनाजे, मडकाणी, ता.शहादा, अक्कलकुवा, चांदसैली, चांदसैली माळ, वेलखेडी, वाझदरे, ता.नंदुरबार, राकसवाडा, ता.नंदुरबार, नळवा या गावातील शेतकऱ्यांसह अनिल जावरे, मोहन वीरसिंग पाडवी, पंडित मानसिंग पाडवी, मोतीराम दाज्या पाडवी, बारक्या बामन्या पाडवी, मदन बाजीराव पाडवी, गौतम ठोग्या पाडवी, जान्या धनजी पाडवी, गुरज्या पेचरा पाडवी, विलास विजय वळवी, संजय रमेश वसावे, सागर गुरज्या पाडवी, सागर गुलाब वळवी, विजय उंबऱ्या वळवी, गुलाब उंबऱ्या वळवी, इंदास तुंबड्या पाडवी, नटवर दामजी वसावे, ब्रिजलाल वळवी, नागेश विजय वळवी, मानसिंग तुंबड्या पाडवी, युवराज बाजीराव पाडवी, रवीदास वळवी, कांतीलाल सुपडू जाधव, प्रेमसिंग केसा वसावे, विजयसिंग वसावे, आशिष विजयसिंग वसावे, गुजऱ्या इरमा वसावे, भीमसिंग गुजऱ्या वसावे, काकड्या बिंद्या वसावे, शंकर बी.वसावे, गुमान पारता वळवी, संदीप गुरज्या पाडवी, ॲड.दीपक ठाकरे, गौतम दामू वळवी, नितीन अशोक वळवी, मुकेश जान्या पाडवी, भाईदास पावरा, सुनील काळुसिंग चौधरी, विजय नुऱ्या पाडवी, तिरसिंग बी. वसावे, नारसिंग वळवी, रवींद्र वळवी, शिवाजी वळवी, दिलीप वळवी, अमर पाडवी, गुलाब एम. पाडवी, मधुकर ठोग्या पाडवी हे सहभागी झाले होते.