पुलाच्या बांधकामाचे आमदार पाडवींकडून भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:22+5:302021-05-28T04:23:22+5:30
दरम्यान, तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरूपा, दसवड मोरवड ते प्रतापपूर, खरवड ते मोड, बोरद ते लाखापूर, न्युबन ते बाेरद, ...

पुलाच्या बांधकामाचे आमदार पाडवींकडून भूमिपूजन
दरम्यान, तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरूपा, दसवड मोरवड ते प्रतापपूर, खरवड ते मोड, बोरद ते लाखापूर, न्युबन ते बाेरद, सिलिंगपूर-मालदा ते तुळाजा, लाखापूर ते धनपूर, सावरपाडा ते सिलिंगपूर, बंधारा ते खर्डी, सलसाडी ते प्रतापपूर, नवागाव ते सलसाडी या रस्ता कामांना सुरुवात करण्यात आल्याने तालुक्यातील उत्तर व पूर्ण भागातील गावांना सोयीचे झाल्याने सोशल मीडियातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडल्याने आम्हा शेतकऱ्यांना शेती शिवारात खते, शेतीमाल ने आण करण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. परंतु स्वत: आमदारांनी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावल्याने परिसरातील रांझणी, पाडळपूर, जीवननगर पुनर्वसन, गोपाळपूर ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. - हेमंत मराठे, शेतकरी, रांझणी.