लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:41+5:302021-07-31T04:30:41+5:30

नंदुरबार : नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते ...

Bhumi Pujan of classrooms of Lokmanya Tilak Vidyalaya by former MLA Chandrakant Raghuvanshi | लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकमान्य टिळक विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार : नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शालेय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

नंदुरबार नगरपालिकेकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. पालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध व्हावी यासाठी वर्ग खोल्या बांधकामाचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार रोजी शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळा परिसराची पाहणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना माजी आमदार रघुवंशी यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या.

या वेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, फारूक मेमन, चेतन वळवी, फरीद मिस्तरी, नगरसेवक सुनील सोनार, प्रशांत चौधरी, संगीता सोनवणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अबुल हसनात, राजू इनामदार, हरून हलवाई, मुख्याध्यापक शेख व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of classrooms of Lokmanya Tilak Vidyalaya by former MLA Chandrakant Raghuvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.