भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:10+5:302021-02-25T04:39:10+5:30
सखुबाई मधुकर पटेल (वय ५५) आमोदातर्फे तळोदा पोस्ट मटावल तालुका कुकरमंडा असे मयताचे नाव आहे. बुधवारी दुपारी ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू
सखुबाई मधुकर पटेल (वय ५५) आमोदातर्फे तळोदा पोस्ट मटावल तालुका कुकरमंडा असे मयताचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गाच्या तळोदा शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर बालाजी पेट्रोल पंपसमोर हा अपघात झाला. धानोरा इथून नातेवाइकाकडे अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. पंप समोर अज्ञात वाहनाने मागून त्यांच्या दुचाकीस( क्रमांक जी,जे,१९ ए पी,५४८२ ला धडक दिली. वाहन तिचे पती मधुकर गोपाल पटेल हे वाहन चालवत होते ओव्हर ट्रेक करताना धडक दिल्याने महिला खाली पडली त्या मुळे डोकं व छातीवरून वाहन गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. पुढील तपास पो. हे. दिलीप साळवे करत आहेत.
अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. अपघातात महिलेचे डोके व छातीच्या संपूर्ण भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने त्या ठिकाणी रक्ताचा मोठा सडा पडला होता. सर्वत्र मांसाचे तुकडे पडलेले दिसत असल्याने हृदयद्रावक चित्र अपघातस्थळी दिसून आले.