नवरात्रोत्सवाच्या काळातही तळोद्यात महावितरणकडून भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:18 IST2018-10-11T12:18:23+5:302018-10-11T12:18:28+5:30

Bharataniman from Mahavitaran in Taloda during Navaratri festival | नवरात्रोत्सवाच्या काळातही तळोद्यात महावितरणकडून भारनियमन

नवरात्रोत्सवाच्या काळातही तळोद्यात महावितरणकडून भारनियमन

तळोदा : तळोदा महावितरणकडून ऐन नवरात्रोत्सवाच्या काळापासूनच शहरासह संपूर्ण तालुक्यात भारनियमन करण्यात येत आह़े त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आह़े सणासुदीच्या काळातच ‘महावितरणला’ असले शहानपण कसे सुचते असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आह़े
एकीकडे इतर राज्यांमध्ये सणांच्या काळात वीज दरात कपात करुन वीज देण्यात येत असत़े तर दुसरीकडे मात्र येथील महावितरणकडून भारनियमन करुन भाविकांच्या भावना दुखावण्यात येत आहेत़ वीज टंचाईचे कारण पुढे करुन संपूर्ण राज्यात महावितरणकडून भारनियमन करण्यास सुरुवात करण्यात आलेली आह़े परंतु येत्या काळात सण उत्सव आहेत त्यामुळे संबंधित विभागाकडून पुरेशा प्रमाणात वीज निर्मिती का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आह़े हिंदू धर्मियांच्या सणांमध्ये विरजन पाडण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्ते करीत आहेत़ नवरात्र, दसरा व दिवाळीमध्ये भारनियमन केल्यास ठिकठिकाणच्या महावितरण कार्यालयांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा संबंधितांनी दिला आह़े 
सध्या सकाळी 5.15 ते 8.15, दुपारी 11 ते 2 व सायंकाळी 6.30 ते 9 वाजेर्पयत भारनियमन करण्यात येत आह़े त्यामुळे नवरात्रोत्सवामध्ये मोठय़ा प्रमाणात खेळल्या जाणा:या गरबा-दांडीयालाही अडथळे निर्माण होत आहेत़ 
आधीच न्यायालयाच्या आदेशानुसार 10 वाजेर्पयत गरबा-दांडिया खेळण्यास अनुमती असताना दुसरीकडे महावितरणकडून भारनियमन होत असल्याने महिलांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े महावितरणच्या अशा कारभाराचा स्थानिक लोकप्रतिनिधीही समाचार घेत नसल्याने नागरिकांना अजूनच मनस्ताप सहन करावा लागत आह़े 
 

Web Title: Bharataniman from Mahavitaran in Taloda during Navaratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.