भांगरापाणी ग्रामपंचायतीतर्फे एक हजार बालकांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:08+5:302021-08-22T04:33:08+5:30

मोलमजुरी व काबाडकष्टावर अवलंबून असलेल्या पालकांचा रोजगार कोरोनामुळे बुडाला. या संकटामुळे प्रत्येकाच्या अडचणी वाढल्या. त्यातून लहान मुलेही सुटले ...

Bhangrapani Gram Panchayat distributes clothes to one thousand children | भांगरापाणी ग्रामपंचायतीतर्फे एक हजार बालकांना कपडे वाटप

भांगरापाणी ग्रामपंचायतीतर्फे एक हजार बालकांना कपडे वाटप

मोलमजुरी व काबाडकष्टावर अवलंबून असलेल्या पालकांचा रोजगार कोरोनामुळे बुडाला. या संकटामुळे प्रत्येकाच्या अडचणी वाढल्या. त्यातून लहान मुलेही सुटले नाहीत. या संकटातून सावरण्यासाठी भांगरापाणी ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भांगरापाणी, जामली, उमटी, पिंवटी, पिंप्रापाणी, वेरी व चनवाई या सात गावांमधील २१ अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित एक हजार नऊ बालकांना ग्रामकोष समितीच्या पाच टक्के अबंध निधीतून कपडे वाटप करण्यात आले. याचा लाभ ५५४ मुले व ४५५ मुलींनी घेतला. कार्यक्रमास सरपंच इमाबाई भरतसिंग तडवी, भरतसिंग तडवी, पं.स. सदस्य तुकाराम वसावे, ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिर्हाडे, माजी सरपंच सोन्या वसावे, कालूसिंग तडवी, धीरसिंग वसावे, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस व पालक उपस्थित होते. या वेळी ग्रामविकासाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Bhangrapani Gram Panchayat distributes clothes to one thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.