भरडू ग्रामसभेत दारू बंद करण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:08 PM2019-08-25T12:08:15+5:302019-08-25T12:08:20+5:30

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील भरडू ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच बाबू गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेत भरडू येथे दारूबंदी ...

Bhadrao Gram Sabha approves liquor closure resolution | भरडू ग्रामसभेत दारू बंद करण्याचा ठराव मंजूर

भरडू ग्रामसभेत दारू बंद करण्याचा ठराव मंजूर

Next

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील भरडू ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच बाबू गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेत भरडू येथे दारूबंदी करण्यात यावी, असा ठराव करण्यात आला.
भरडू येथे झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विशाल विष्णू वळवी यांनी गावात ग्रामस्थांच्या वतीने दारूबंदीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी दारूचे होणारे दुष्परिणाम सभेत मांडले.  गावात दारूबंदीचा ठराव मांडून सर्वानुमते मंजूर करण्यात आला.  1 सप्टेंबर 2019 पासून  भरडू गावात संपूर्णत: दारूबंदी करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरनंतर गावात दारू विक्रेत्यांनी दारू पुन्हा बनवून विकणे सुरू केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठरले. 
याबाबतचे निवेदन गावातील महिला बचत गट यांच्याद्वारे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले. निवेदनावर भरडू येथील पोलीस पाटील महेश वळवी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय वळवी, सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ङिाना वळवी, विशाल वळवी, दिनकर वसावे, दावीन गावीत, अनिल वळवी, अरुण वळवी, गिरीश वळवी, बारक्या वळवी, आकाश वळवी, निलेश गावीत, भरडू गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष देवका वळवी, निरमा गावीत, निमला वळवी, रिपका वसावे, पानी गावीत, सारिका वळवी, रोहिणी गावीत आदींच्या सह्या आहेत.
 

Web Title: Bhadrao Gram Sabha approves liquor closure resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.