‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:20+5:302021-06-01T04:23:20+5:30
नंदुरबार : फेक कॉल करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सीम व्हेरिफिकेशन संदर्भातील विविध फोन कॅालमुळे ...

‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान
नंदुरबार : फेक कॉल करून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सीम व्हेरिफिकेशन संदर्भातील विविध फोन कॅालमुळे अनेकजण फसविले जात असल्याचे समोर येत आहे. काहीजण भीतीपोटी तक्रारी करीत नाहीत.
पूर्वी बॅंक खातेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून अनेकांना फसविण्यात आले होते. याबाबत बॅंकांनी जनजागृती करीत, खातेदारांना थेट मेसेज करीत अशा प्रकारांना भुलून जाऊ नये, असे आवाहन केल्याने असे प्रकार कमी झाले आहेत. आता मोबाइल नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांच्या नावे मेसेज व फोन कॉल येत आहेत.
त्यात सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा स्वरूपाचे कॉल व मेसेजचा सर्वाधिक प्रकार होत आहे. सीम कार्डच्या माध्यमातून आधार कार्ड, जन्म तारीख व इतर माहिती घेऊन लागलीच बॅंक अकाउंटची माहिती ऑनलाइन काढली जात आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सायबर सेलच्या माध्यमातून वेळोवेळी आवाहनदेखील केले जात असून, फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे मोबाइलधारकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.