फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रॅप’ वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:28+5:302021-06-11T04:21:28+5:30
नंदुरबार : सोशल मीडियाद्वारे विशेषत: फेसबुकवर ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढू लागले असून अनोळखी सुंदरीच्या मोहजालात फसू नका, असे ...

फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रॅप’ वाढले!
नंदुरबार : सोशल मीडियाद्वारे विशेषत: फेसबुकवर ‘हनी ट्रॅप’चे प्रकार वाढू लागले असून अनोळखी सुंदरीच्या मोहजालात फसू नका, असे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात येत आहे. या प्रकारात अनेकजण अडकले असून काहींनी तोंडी तक्रारी केल्या आहेत तर काही जण बदनामीपोटी तक्रारी करीत नसल्याचे चित्र आहे.
अवैध कमाईचे साधन कोण कुठून आणि कसे शोधून काढेल याचा अंदाज नाही. आता सोशल मीडिया तर अशा लोकांना सहज साधन होऊन गेले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेले अनेकजण अशा प्रकारांना फसत आहेत. पुरुषच नव्हे तर महिलादेखील त्याला बळी पडत आहेत. या माध्यमातून ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला जात आहे. सायबर सेलकडे तक्रारी कमी येत असल्यामुळे फसवणूक झालेल्यांचा आकडा समोर येत नाही. अशा जाळ्यात अडकण्यापेक्षा सावधगिरीने फेसबूक आणि इतर सोशल मीडियाचा वापर करावा, असे आवाहन सायबर सेलतर्फे केले जात आहे.