आश्वासनानंतर उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:25+5:302021-08-15T04:31:25+5:30
याबाबत वृत्त असे की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पाटा लगत एका व्यावसायिकाने पक्के अतिक्रमण केले आहे. याबाबत गणेश ठाकरे ...

आश्वासनानंतर उपोषण मागे
याबाबत वृत्त असे की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पाटा लगत एका व्यावसायिकाने पक्के अतिक्रमण केले आहे. याबाबत गणेश ठाकरे हे अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा देत आहेत. पाटबंधारे विभागासह महसूल, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांकडे लेखी निवेदन, अर्ज, विनंती करूनही कारवाई होत नसल्याने अखेर मंगलाबाई गणेश ठाकरेंसह गणेश ठाकरे, दोन मुले, सुना व नातवंडांसह १२ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले. गुरुवारी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्यात चर्चा झाली. कुटुंबीयांसह उपोषणास बसलेल्या ठाकरे कुटुंबीयांना उपोषण मागे घेण्याची प्रशासनाकडून सूचना करण्यात आली. मात्र, ते निर्णयावर ठाम राहिल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच होते. शुक्रवारी पालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांनी उपोषणकर्ते तसेच प्रशासनाशी चर्चा केली. यशस्वी मध्यस्थीनंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसात सीमांकनासह नियमानुसार कारवाई करण्याबाबत लेखी पत्र दिले. यावेळी आमदार राजेश पाडवी, प्रा. मकरंद पाटील, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता पी.एस. पवार आदींच्या उपस्थितीत ठाकरे यांनी लिंबूपाणी घेत उपोषण सोडले.