गोमाई नदी नांगरटीच्या उपक्रमाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:15 IST2019-05-30T21:15:14+5:302019-05-30T21:15:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पावसाचे पाणी नदीतून वाहून जावू नये याकरिता सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदीपात्रात नांगरटीच्या उपक्रमास ...

गोमाई नदी नांगरटीच्या उपक्रमाला सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पावसाचे पाणी नदीतून वाहून जावू नये याकरिता सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदीपात्रात नांगरटीच्या उपक्रमास बुधवारी सुरूवात करण्यात आली.
शहादा तालुक्यातून वाहणा:या गोमाई नदीचे पात्र कोरडे ठणठणीत झाले असून, या नदीपात्रातील वाळूचे मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्यामुळे नदीतील पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे नदी परिसरातील बोरवेल आटल्या असून, अनेक बोअरवेल कोरडय़ा ठणठणीत झाल्या आहेत. त्यामुळे नदी परिसरातील गांवामध्येदेखील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.
लवकरच पावसाळा सुरू होणार असून, या पावसाळ्यात नदीतील पाणी वाहून जाऊ नये व मोठय़ा प्रमाणात पाणी जमिनीत मुरावे यासाठी सातपुडा साखर कारखान्यातर्फे गोमाई नदी नांगरटीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लोणखेडा ते मलोणीर्पयत नांगरटी करण्यात येणार आहे. कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी लोणखेडा येथे पुलाखाली नदी नांगरटी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी हैदरअली नुरानी, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन रोहिदास पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, कारखान्याचे संपर्कप्रमुख प्रवीण पाटील, जगदीश पाटील, विनोद पाटील, लोणखेडाचे अशोक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गोमाई नदी नांगरटी केल्याने निश्चितच परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला. शहादा शहराला पाणीपुरवठा करणा:या नगरपालिकेचे बोअरवेलदेखील गोमाई पात्रात असल्याने या उपक्रमामुळे पालिकेलाही फायदा होऊ शकेल.