पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:00 IST2019-02-18T12:00:29+5:302019-02-18T12:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाच्या जिल्हा कृषि महोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ महोत्सवात 150 स्टॉल्स उभारण्यात आले असून ...

पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी विभागाच्या जिल्हा कृषि महोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ महोत्सवात 150 स्टॉल्स उभारण्यात आले असून खासदार डॉ.हिना गावीत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले होत़े
प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, डॉ.मुरलीधर महाजन, ए.के.अनापुरे, डॉ.श्रीधर देसले, उमेश पाटील, आर.एम.जेजुरीकर, डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ.एस.बि.खरबडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, आत्मा प्रकल्प उपसंचालक टी.व्ही.खर्डे, कृषी उपसंचालक एम.एस.रामोळे, हेमलता शितोळे, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी. जोशी, वसुंधरा दिपक पटेल, कृषी अधिकारी संदिप वळवी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पी.व्ही.भोर, बी.जे. गावीत, एन.आर. महाले, व्ही.डी.चौधरी, ए.स. वसावे उपस्थीत होते.
आत्माअंतर्गत चांगले काम करणारे शेतकरी व महिला बचत गटांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आल़े पात्र शेतक:यांना ट्रॅक्टर वितरणही करण्यात आले. प्रास्ताविक आत्माचे संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी केल़े महोत्सवात 150 विविध स्टॉल लावण्यात आले आहे. यातील 40 स्टॉल्स हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे आहेत़ पाच दिवसात कृषी विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी परिसंवाद आणि चर्चासत्रांचे होणार आह़े
प्रसंगी खासदार डॉ़ गावीत यांनी जागतिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रीय मालाला अधिक मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत़ शेतक:यांनी सेंद्रीय शेतीला यांत्रीकीकरणाची जोड दिल्यास देशाला सेंद्रीय शेतमाल पुरवठादार जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण होईल. असे सांगितल़े आमदार डॉ़ गावीत, जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केल़े