मोरखींकडून मानता सोडण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:46 IST2020-03-14T12:46:32+5:302020-03-14T12:46:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चंद्र व सुर्यावरुन होणाऱ्या पपारंपरिक कालगणनेनुसार माघ अमावास्येच्या आधी होळीसाठी व्रत पाळणाºया मोरखींनी दुधाने ...

Begin to give up on the fools | मोरखींकडून मानता सोडण्यास प्रारंभ

मोरखींकडून मानता सोडण्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चंद्र व सुर्यावरुन होणाऱ्या पपारंपरिक कालगणनेनुसार माघ अमावास्येच्या आधी होळीसाठी व्रत पाळणाºया मोरखींनी दुधाने पवित्र स्नान करीत मानतेला सुरुवात केली होती. होळींची नियोजित संख्या पूर्ण केल्यानंतर काही मोरखींनी त्यांचा सामान तथा मानता सोडण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्त अखेरची पूजाविधी व पुन्हा दुधानेच स्रान करीत आहे.
आदिवासी जमातीत आजही चंद्र व सुर्यावरुन कालगणना होत आहे. यंदाच्या होळीसाठी देवमोगरा यात्रेपासूनच गणना सुरू झाली, त्यानुसार सातपुड्यातील व्रत पाळणाºया मोरखी यांनी माघ अमावास्येला होळीसाठी दुधाने पवित्र स्रान केली होती. अमावास्येनंतर येणारा चंद्रकोर (अमावास्येनंतर पहिल्या दिवशी येणारा चंद्राचा भाग) याचे दर्शन घेत मानता तथा व्रत पाळण्यास सुरुवात केली होती. व्रत पाळणाऱ्यांमध्ये मोरपीस व मोठ्या पितळी घुंगरुवाला मोरखी, बांबूपासून निर्मिती टोप व दुधी भोपळे कमरेला बांधणारा बावा-बुद्या, हातात बांबूची सुपडी व लाकडी चमचा बाळगणारा काली, धनुष्यबाण बाळगणारा मोरावाला व लाकडी घोडावाला यांचा समावेश आहे. या सर्वांना होळीची ठराविक संख्या पूर्ण करावीच लागते, ही संख्या पूर्ण करण्यासाठी जवळपासच्या गावांमधील होळीत सहभागी होऊन तेथील होळीचे दर्शन घेणे आवश्यक असते. त्यानुसारच होळीला सुरुवात झाल्यापासून बहुतांश मोरखी यांनी त्यांची संख्या पूर्ण केली आहे. त्यामुळे या मोरखींकडून होळीची मानता तथा व्रत सुटण्यास सुरुवात झाली आहे.
मानतासाठी मोरखींचे संपूर्ण सामान, कपडे, अंथरुण-पांघरुणच्या चादरी व अन्य साहित्यही दुधाचा शिडकावा देत ती धुतली गेली होती. या साहित्याला अन्य कोणीही हात लावू शकत नाही. त्यामुळे हे सर्व साहित्य या मोरखींना निर्जन ठिकाणीच अलिप्त ठेवली होती. या साहित्यांसह होळीची संख्या पूर्ण करणारे मोरखी हे त्यांच्या ठराविक पुजारी यांच्याकडून अखेरची पूजाविधी करुन घेत आहे. ही पूजाविधी नेहमी नदीकाठावरच करावी लागत असल्याने सातपुड्यातील बहुतांश नदीकाठावर अखेरची पुजाविधी करणाºयांची संख्या वाढली आहे. या मोरखींकडून पुजाविधीनंतर पुन्हा दुधानेच पवित्र स्रान केली जात आहे.
सातपुड्यात होळीचा समारोप झाला नसला तरी या बहुतांश मोरखींकडून सामान सोडविण्यात येत आहे. सामान सोडवत न संपलेल्या होळीसाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच तेही सहभागी होत आहे.

Web Title: Begin to give up on the fools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.