लॉकडाऊन काळात दारु विक्री केल्याप्रकरणी बियरबारचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:20 IST2020-04-27T21:19:55+5:302020-04-27T21:20:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील कोरीट नाका परिसरातील बियर बार सुरु ठेवून मद्यविक्री करणाऱ्यावर बारमालकावर एलसीबीच्या पथकाने शनिवारी ...

लॉकडाऊन काळात दारु विक्री केल्याप्रकरणी बियरबारचा परवाना रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील कोरीट नाका परिसरातील बियर बार सुरु ठेवून मद्यविक्री करणाऱ्यावर बारमालकावर एलसीबीच्या पथकाने शनिवारी कारवाई केली होती़ या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बियरबारचा परवाना रद्द करण्याची कारवाई सोमवारी केली़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित आहे़ असे असतानाही शहरातील कोरीट नाका परिसरात गजराज बियरबारमध्ये मद्यविक्री सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने येथे पाहणी करुन माहिती घेत डमी ग्राहक पाठवून मद्याची मागणी केली होती़ हॉटेलच्या मागील बाजूने मद्याची विक्री सुरु असल्याची खात्री झाल्यावर एलसीबीचे पोलीस निरीक्षक नवले यांच्यासह पथकाने येथे छापा टाकला होता़ यावेळी तिघे मद्य प्राशन करत होते़ त्यांनी पोलीस पथकाला पाहून पळ काढला होता़ दरम्यान काउंटरवर थांबलेल्या मनोज हिरालाल चौधरी रा़जयचंद नगर याला ताब्यात घेतले असता त्याने चोरटी विक्री केल्याची कबुली दिली आहे़ त्याला पथकाने ताब्यात घेतले घेत त्याच्याकडून ३ लाख २ हजार ३०५ रुपयांचे देशी विदेशी मद्य, बियरच्या बाटल्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे़ याबाबत हॉटेलमालक दिलीप हिरालाल चौधरी व मनोज हिरालाल चौधरी या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पथकातील पोलीस निरीक्षक नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांच्यासह पथकाने केली़
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे परवाना रद्द केला आहे़ अधीक्षक युवराज राठोड, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे, जवान हितेश जेठे, वाघ यांनी कारवाई केली़