गोमांस विक्री करणा:या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:46 IST2019-08-01T12:46:41+5:302019-08-01T12:46:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उघडय़ावर गोमांस विक्री करणा:या दोघांविरुद्ध नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 रोजी ही ...

गोमांस विक्री करणा:या दोघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उघडय़ावर गोमांस विक्री करणा:या दोघांविरुद्ध नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 रोजी ही कारवाई करण्यात आली.
गोमांस विक्रीवर बंदी असतांनाही नंदुरबारात सर्रास त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत्या. त्याची पोलिसांनी दखल घेत शहरातील मन्यार मोहल्ला भागात तपासणी केली. तेथे दोनजण उघडय़ावर गोमांस विक्री करीत असतांना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून एकुण 50 किलो गोमांस जप्त करण्यात आले.
याबाबत महिला पोलीस उपनिरिक्षक प्रिती शैलेश गावीत व हवालदार गोकुळ बंजारा यांनी फिर्याद दिल्याने मुमताज शेख रेहमान व आणखी एका विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कुवर करीत आहे.