अंत्यविधीवेळी ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:57 PM2020-02-26T12:57:39+5:302020-02-26T12:57:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : मोठे कडवान ता़ नंदुरबार येथे मयत महिलेच्या दफनविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याची घटना ...

Bee attack on villagers during funeral | अंत्यविधीवेळी ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवला हल्ला

अंत्यविधीवेळी ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवला हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : मोठे कडवान ता़ नंदुरबार येथे मयत महिलेच्या दफनविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ मधमाशांनी तीव्रतेने चावा घेतल्याने काही जण जखमी झाले होते़ त्यांना खांडबारा ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
लक्ष्मीबाई सखाराम वळवी रा़ मोठे कडवान यांचे निधन झाल्याने ग्रामस्थ त्यांच्या अंत्यविधीसाठी सोमवारी सकाळी एकत्र झाले होते़ गावातील दफनभूमीत त्यांचा अंत्यविधी होणार असल्याने ग्रामस्थ त्याठिकाणी जमले होते़ याच दरम्यान या परिसरातील मधमाशांनी चावा घेण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांची पळापळ झाली़ मधमाशा पाठलाग करत असल्याने मिळेल त्या वाटेने पळत सुटले होते़ हातपायासह चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने वृद्ध जखमी झाले़ सरपंच बंधू पाच्या वळवी यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी सावध पवित्रा घेत ग्रामस्थांना पळापळी न करण्याच्या सूचना केल्या़ परंतू मधमाशा पूर्णपणे चवताळल्याने गोंधळ वाढत होता़ मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून उपचार घेत जखमी घरी परतल्याची माहिती आहे़


हा प्रकार सुरु असताना लक्ष्मीबाई वळवी यांचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता़ दुपारी विसरवाडी येथून जेसीबी मागवून ग्रामस्थांनी अंत्यविधी पूर्ण करुन घेतला़ यावेळी मधमाशा घोंगावत असल्याने लांबूनच धार्मिक विधी पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Bee attack on villagers during funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.