शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आत्मनिर्भर बनत हस्तकलेतून मिळवला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:25 IST

हर्षल साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घालून स्तब्ध केले आहे. शासनाने कोरोना ...

हर्षल साळुंखे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घालून स्तब्ध केले आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करून वेळोवेळी ते वाढवले आहे. ६० दिवसांपेक्षा जास्तीच्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्याने लोकं आता घरी राहून कंटाळले असताना शहादा शहरातील सोनल खेडकर या विद्यार्थिनीने या वेळेचा सदुपयोग करीत हस्तकलेतून आत्मनिर्भर बनण्याच्या प्रयत्न केला आहे.कोरोना या भयंकर विषाणूमुळे लॉकडाऊन झाले व ते आता पाळावे लागणार असल्याने आता घरात बसल्याशिवाय पर्याय नाहीच, असे देशवासियांना समजले. मग घरात बसून करायचे काय? असा प्रश्न सुरुवातीला सगळ्यांना पडू लागला. लोकांनी घरात निरनिराळे खेळ खेळणे पसंत केले तर काहींनी विविध रेसिपी बनवून त्यावर ताव मारून टाईमपास करून घेतला. तरीही काही लोकांना घरात बसून कंटाळा आला. त्यातच शहादा शहरातील द्वारकाधीश नगरमध्ये राहणारी विद्यार्थिनी सोनल विजय खेडकर हिने या फावल्या वेळेचा फायदा घेत हस्तकलेतून विविध वस्तू तयार करत ते विक्री करून वेळेचा सदुपयोग करून घेतला. सोनल व तिची आई पापड लाटून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करतात. तीन वर्षापूर्वी सोनलच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईवर सर्व जबाबदारी आली. सोनलला तीन बहिणी असून दोघांची लग्न झाले तर एक बहीण बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. उदरनिर्वाहासाठी परिस्थितीच्या सामना या मायलेकी करतात. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह कसा होईल हा प्रश्न समोर असताना कोणाकडून मदत न मागता या विद्यार्थिनीने पंतप्रधानांच्या आवाहनाआधीच आत्मनिर्भर बनत स्वत:च्या हस्तकलेतून विविध आकर्षक वस्तू बनवणे व आॅर्डर घेऊन तयार करत आहे.सोनल हस्तकलेतून फोटो फ्रेम, झुंबर, गुलदस्ता, विविध प्रकारचे तोरण, मोबाईल व पेन स्टँड, हॉलमध्ये लावण्यासाठी कुल्फीच्या काड्यांपासून आकर्षक वस्तू, आकर्षक डिझाईनच्या पायपुसण्या, साडीपासून गोधडी, दोरीचे झोके, दिवे आदी वस्तू बनवत आहे. तिच्या हस्तकलेतील वस्तू पाहताक्षणी लोकांचे मन मोहित करत आहे. परिसरातील महिलांकडून सोनलला विविध वस्तू बनवण्यासाठी सांगण्यात येत आहे व त्या वस्तूंची खरेदी होत आहे. सोनलने बनवलेल्या साडीपासूनची गोधडी व पायपुसणीला मोठी मागणी आहे. कमी वयात जगण्यासाठी धडपड करणाºया विद्यार्थिनीचे कौतुक होत असून रिकाम्या वेळेचा उपयोग करीत परिस्थितीचा बाहू न करता स्वत:च्या मेहनतीवर आपल्या मात करण्याचा प्रयत्न या विद्यार्थिनीने केला आहे.हातमजुरीवर आमचा उदरनिर्वाह होतो. लॉकडाऊन काळात जगायचे कसे असा प्रश्न पडला होता. मात्र हस्तकलेत आवड असल्याने खचून न जाता जिद्दीने हस्तकला वस्तू निर्मितीला सुरुवात केली व त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. परिसरातील महिलांकडून वस्तूंना मागणी असल्याने आनंद होत आहे.-सोनल विजय खेडकर,हस्तकलेतून वस्तू बनवणारी विद्यार्थिनी, शहादा.