शेतात कामाला जाण्याच्या वादातून मारहाण, दागीने चोरले, परस्पर विरोधी फिर्यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:00+5:302021-02-25T04:39:00+5:30
नंदूरबार : दुसऱ्याच्या शेतात कामाला का जाते या वादावरून चौघांनी महिलेस मारहाण करून २५ हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना ...

शेतात कामाला जाण्याच्या वादातून मारहाण, दागीने चोरले, परस्पर विरोधी फिर्यादी
नंदूरबार : दुसऱ्याच्या शेतात कामाला का जाते या वादावरून चौघांनी महिलेस मारहाण करून २५ हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना राणीपूर, ता.तळोदा येथे घडली. तर दुसऱ्या गटातर्फे देखील फिर्याद देण्यात आली आहे.
राणीपूर येथील बाजूबाई खेत्या वसावे ही महिला भारतीबाई वाघ यांच्या शेतात कामाला का जाते याचा जाब विचारत सोमा खेत्या वसावे, कौशल्या किशोर नाईक, नीलिमा बोटूसिंग वसावे व शांतीबाई सोमा वसावे यांनी महिलेस मारहाण करून, वीट मारून फेकून जखमी केले. शिवाय महिलेजवळील २५ हजार रुपयांचे दागिने देखील काढून घेतले. याबाबत बाजूबाई वसावे यांनी फिर्याद दिल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अभय मोरे करीत आहे.
दुसरी फिर्याद विजयसिंग करमसिंग वाघ यांनी दिली. आजीला का घेण्यास आला असे विचारून सोमा खेत्या वसावे, अरुण सोमा वसावे, साहिल सोमा वसावे यांनी धारदार शस्त्राने वार करून तसेच दगडाने मारून जखमी केले. याबाबत विजयसिंग वाघ यांनी फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक कमलसिंग जाधव करीत आहे.