‘तमाशा’ पहाण्याचा वादातून रनाळेत झाली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:26 IST2020-02-13T12:26:07+5:302020-02-13T12:26:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तमाशाचा आनंद उड्या मारून घेणाऱ्यास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यातून झालेल्या वादात मारहाण व ...

A beating in the ranch over the promise of seeing a 'spectacle' | ‘तमाशा’ पहाण्याचा वादातून रनाळेत झाली मारहाण

‘तमाशा’ पहाण्याचा वादातून रनाळेत झाली मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तमाशाचा आनंद उड्या मारून घेणाऱ्यास समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यातून झालेल्या वादात मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याचा प्रकार रनाळे येथे घडला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे.
रनाळे येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. या वेळी नंदू पिंटू सोनवणे हा उड्या मारून आरडाओरड करीत होता. त्यास मन्या सन्या भिल हा समजविण्यास गेला. परंतु त्याचा राग आल्याने संतोष भिमा पाटील, संतोष रमेश सापन, योगेश रमेश सानप, गज्या आव्हाड, कांत्या गज्या आव्हाड यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिविगाळ केल्याची फिर्याद मन्या भिल यांनी दिली आहे. त्यावरून पाचही जणांविरुद्ध मारहाण, जातीवाचक शिविगाळ आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक रमेश पवार करीत आहे.
मजुरांना रोजगार
नंदुरबार : मिरची पथारींवर मजुरांना बºयापैकी रोजगार मिळत आहे. २०० पेक्षा अधीक मजूर या ठिकाणी कामाला आहेत. मजुरीचे दर देखील बºयापैकी असल्यामुळे मजुरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: A beating in the ranch over the promise of seeing a 'spectacle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.