शेतीच्या वाटणीवरून मारहाण, दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:38+5:302021-02-06T04:57:38+5:30
नंदुरबार : शेती वाटणीच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना अजरखर्जीपाडा, ता. धडगाव येथे घडली. तिघांविरुद्ध धडगाव पोलीस ...

शेतीच्या वाटणीवरून मारहाण, दोनजण जखमी
नंदुरबार : शेती वाटणीच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना अजरखर्जीपाडा, ता. धडगाव येथे घडली. तिघांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, अजरखर्डीपाडा येथील राड्या फोड्या वसावे व रमिला जहागा वसावे यांच्यात शेती वाटणीचा वाद होता. राड्या यांनी शेतीचा हिस्सा मागितला. त्याचा राग येऊन रमिला जहागा वसावे, किरसा जहागा वसावे व सुमन जहागा वसावे, (रा. अट्टी अजरखर्डीपाडा) यांनी कुऱ्हाड व दगडाने मारून जखमी केले. त्यात राड्या वसावे व मुकटीबाई वसावे हे जखमी झाले. त्यांच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत राड्या वसावे यांनी फिर्याद दिल्याने रमिला, किरसा व सुमन वसावे यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दिलीप महाजन करीत आहे.