मुंदलवड येथे मारहाणीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:58 IST2020-05-05T11:58:02+5:302020-05-05T11:58:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंदलवडचा चिरखेडपाडा येथे वादातून एकास बेदम मारहाण केल्याची घटना २ मे रोजी घडली होती़ ...

मुंदलवड येथे मारहाणीत मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुंदलवडचा चिरखेडपाडा येथे वादातून एकास बेदम मारहाण केल्याची घटना २ मे रोजी घडली होती़ उपचार सुरु असताना मारहाण झालेल्याचा मृत्यू झाला आहे़
मुंदलवड चिरखेडपाडा येथील हान्या माकत्या पाडवी व गजेंद्र माकत्या पाडवी या दोघांनी घराजवळ असलेल्या नाल्यात सागाची झाडे सामाईकपणे लावली होती़ यातून त्यांच्यात वाद सुरु होता़ दरम्यान शनिवारी दुपारी गजेंद्र माकत्या पाडवी, किसन माकत्या पाडवी, मिना किसन पाडवी, कनिला किसन पाडवी सर्व रा़ चिरखेडपाडा यांनी हान्या पाडवी यांना बेदम मारहाण केली होती़ गंभीर जखमी पाडवी यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा ३ मृत्यू झाला होता़ याप्रकरणी चौघांविरोधात यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्ह्याप्रकरणी पोलीसांनी रविवारी रात्री किसन पाडवी यास अटक केली आहे़ तपास पोलीस निरीक्षक डी़एसग़वळी करत आहेत़