गोमांस विक्रीच्या वादातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:59 IST2020-09-03T12:58:43+5:302020-09-03T12:59:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमास विक्रीसाठी का आणले याबाबत विचारणा केली तसेच समाजासाठी पैसे देत नाही या कारणावरून ...

गोमांस विक्रीच्या वादातून मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गोमास विक्रीसाठी का आणले याबाबत विचारणा केली तसेच समाजासाठी पैसे देत नाही या कारणावरून शहादा येथे दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील सहाजण जखमी झाले. याबाबत परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या.
पहिली फिर्याद इरफान मुख्त्यार कुरेशी, रा.गरीब नवाज कॉलनी यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून कामील कुरेशी व इतरांनी समाजासाठी पैसे देत नाही या कारणावरून वाद घातला. लोखंडी दांडक्याने, टॉमीने हातापायांवर मारहाण केली. या मारहाणीत इरफान कुरेशी, रिजवान मुख्तार कुरेशी, अमीरखान मुख्तारखान पठाण, रा.गरीब नवाज कॉलनी हे जखमी झाले. याबाबत इरफान कुरेशी यांनी फिर्याद दिल्याने कामील कुरेशी, रियाज मेंबर, इरफान कुरेशी, इम्तीयाज कुरेशी, सादीक कुरेशी, जुबेर कुरेशी, हाकीम मेबर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जलाल शेख करीत आहे.
दुसरी फिर्याद सोहेल कादरशेख, रा.खेतियारोड, शहादा यांनी दिली. जुबेरखान करीमखान कुरेशी यांना गोमास विक्रीसाठी का आणले याबाबत विचारणा केली असता त्याचा राग येऊन जमावाने मारहाण केली. मारहाणीत रियाज लतीफ कुरेशी, कामिल रज्जाक कुरेशी, इरफान कय्यूम कुरेशी सर्व रा.खेतियारोड शहादा हे जखमी झाले. सोहेल शेख यांच्या फिर्यादीवरून जुबेरखान करीमखान कुरेशी, फरीदखान करीमखान कुरेशी, सलमानधान सलीमखान कुरेशी सर्व रा.फत्तेपूर, ता.शहादा व रिजवान मुख्तारखान कुरेशी, आमीरखान मुख्तारखान कुरेशी, इरफानखान मुख्तारखान कुरेशी सर्व रा.गरीबनवाज कॉलनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाइक गोसावी करीत आहे.