दोन ‘सिक्स’ मारल्याच्या रागातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:09 IST2019-12-18T12:09:08+5:302019-12-18T12:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्रिकेट खेळत असताना सलग दोन बॉलवर दोन षटकार ठोकल्याच्या रागातून एकास चौघांनी बेदम मारहाण ...

दोन ‘सिक्स’ मारल्याच्या रागातून एकास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : क्रिकेट खेळत असताना सलग दोन बॉलवर दोन षटकार ठोकल्याच्या रागातून एकास चौघांनी बेदम मारहाण केली़ तालुक्यातील रनाळे येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडलेल्या मारहाण प्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला़
रनाळे गावातील आंबेडकर चौक मैदानात शनिवारी क्रिकेटचा खेळ रंगला असताना प्रकाश देविदास जाधव रा़ रनाळे याने दोन षटकार मारत जल्लोष केला होता़ याचा राग आल्याने समाधान ब्रिजलाल पिंपळे, सुमित संजय गुलाले या दोघांनी प्रकाश जाधव यास मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात दोघांनी लोखंडी रॉडपे कपाळावर तसेच बॅटने खांद्याजवळ मारुन दुखापत केली़ दरम्यान सुमित याची आई व समाधान याची आजी या दोघींनीही प्रकाश यास मारहाण केली़ जखमी प्रकाश जाधव याचे वडील हे बाहेरगावी गेले असल्याने ते परत आल्यानंतर सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश जाधव याच्या फिर्यादीवरुन समाधान पिंपळे, सुमित गुलाले यांच्यासह दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़