वीज कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:37 IST2020-01-06T12:37:17+5:302020-01-06T12:37:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तिखोरा ता़ शहादा येथे शेतातील खांबावरुन वीज तार काढणाºया वीज अभियंता व कर्मचाऱ्यांसोबत दोघांनी ...

Beat the electrical worker | वीज कर्मचाऱ्याला मारहाण

वीज कर्मचाऱ्याला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तिखोरा ता़ शहादा येथे शेतातील खांबावरुन वीज तार काढणाºया वीज अभियंता व कर्मचाऱ्यांसोबत दोघांनी हुज्जत घालून अभियंत्यास मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली़ याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे़
वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सचिन विठ्ठल पावरा हे वीज कर्मचारी शिरीष पवार, शशिकांत पवार, भूषण बागले, गौरवकुमार व्यास, रविंद्र बच्छाव, संदीप भाट यांच्यासोबत शनिवारी तिखोरा ता़ शहादा येथील डॉ़ भिका कानजी पाटील यांच्या मालकीच्या शेतात गेले होते़ याठिकाणी वीज चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ यातून पाहणी दरम्यान पथकाला त्याठिकाणी लावलेली काळ्या रंगाची वायर लावलेली दिसून आली़ वीज ही वायर कर्मचारी काढत असताना विलास उत्तम पाटील व कार्तिक विलास पाटील हे दोघेही आले़ त्यांनी तार काढण्यास मज्जाव करत अभियंता सचिन पावरा यांच्यासोबत वाद घालून कर्मचाºयांना शिवीगाळ केली़ दरम्यान विलास पाटील व कार्तिक पाटील या दोघांनी अभियंता सचिन पावरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ कर्मचाºयांनी मध्यस्थी केल्यानंतर पावरा यांची सोडवणूक करण्यात आली़
याबाबत अभियंता सचिन पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विलास पाटील व कार्तिक पाटील दोन्ही रा़ शंकर नगर शहादा, यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत़

Web Title: Beat the electrical worker