सलसाडी येथे एकास वादातून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 13:20 IST2019-01-09T13:20:23+5:302019-01-09T13:20:28+5:30

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे आश्रमशाळेत शासकीय अधिका:यांना मारहाण झाल्याच्या गुन्ह्यात नाव सांगितल्याच्या संशयातून एकास मारहाण झाली़ शुक्रवारी ...

Beasley assaulted by one man at Salsadi | सलसाडी येथे एकास वादातून बेदम मारहाण

सलसाडी येथे एकास वादातून बेदम मारहाण

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे आश्रमशाळेत शासकीय अधिका:यांना मारहाण झाल्याच्या गुन्ह्यात नाव सांगितल्याच्या संशयातून एकास मारहाण झाली़ शुक्रवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार घडला़ 
सलसाडी येथे अनिल किरण वळवी (39) याने भाच्याचे नाव मारहाणीच्या केसमध्ये सांगिल्याच्या संशयावरुन विद्याबाई चुनिलाल ठाकरे, महेश चुनीलाल ठाकरे, उमेश चुनीलाल ठाकरे, गायत्रीबाई चुनिलाल ठाकरे, कौशल्याबाई चुनिलाल ठाकरे, सुमित्राबाई राजेंद्र वळवी, सुहास अशोक ठाकरे, सुरेश अशोक ठाकरे, राहुल जयविर ठाकरे, यमुनाबाई जयविर ठाकरे, चुनिलाल सुपडू ठाकरे यांनी शुक्रवारी हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ सलसाडी गावातील दारासिंग ठाकरे याच्या किराणा दुकानासमोर हा प्रकार घडला होता़  ग्रामस्थांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा प्रकार थांबल्याचे सांगण्यात येत आह़े याबाबत अनिल वळवी यांनी सोमवारी  तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व 11 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बळवंत वळवी करत आहेत़ 
 

Web Title: Beasley assaulted by one man at Salsadi