अंडापाव बनवून देण्याच्या वादातून नंदुरबारमध्ये हाणामारी
By Admin | Updated: July 2, 2017 10:52 IST2017-07-02T10:52:43+5:302017-07-02T10:52:43+5:30
आधी अंडापाव बनवून दे, असे सांगितल्यानंतर झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना नंदुरबार शहरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़,

अंडापाव बनवून देण्याच्या वादातून नंदुरबारमध्ये हाणामारी
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.2 - मला आधी अंडापाव बनवून दे, असे सांगितल्यानंतर झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना नंदुरबार शहरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली़, यात एक जखमी झाला आह़े
कैलास आप्पा पेंढारकर रा़ आंबेडकर चौक, हे शहरातील मंगळ बाजारातील अंडापावच्या गाडीवर रात्री गेले असता, त्या ठिकाणी अल्पेश प्रकाश मराठे, योगेश गुलाब राजपूत, कृष्णा गुलाब राजपूत या तिघांनीही त्यांच्यासोबत वाद घातला. यातून अल्पेश मराठे यांनी कैलास पेंढारकर यांच्यावर लोखंडी फायटरने वार करून जखमी केल़े यात कैलास पेंढारकर हे गंभीर जखमी झाले आह़े रात्री उशिरा झालेल्या या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत आह़े
पेंढारकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अल्पेश मराठे, योगेश राजपूत व कृष्णा राजपूत या तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तिघांना पोलीस पथकाने शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अटक केली़