भगदरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून बॅटरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:30 IST2020-09-23T12:29:54+5:302020-09-23T12:30:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भगदरी ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लावलेले बॅटरी व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले़ ...

भगदरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून बॅटरी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भगदरी ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लावलेले बॅटरी व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले़ सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली़
भगदरी गावात पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना आहे़ याठिकाणी २५ हजार रूपये किमतीचे बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलर सिस्टीम लावण्यात आली आहे़ रविवारी सुटी असल्याने दवाखाना बंद होता़ सोमवारी सकाळी दवाखान्याचा दरवाजा तोडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसून आले होते़ त्यांनी ही माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी भेट देत पाहणी केली असता, चोरीचा प्रकार समोर आला़ याबाबत सुरेश गोपीचंद ढिवरे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हवालदार पटले करत आहेत़ घटनेमुळे खळबळ उडाली असून दुर्गम भागातील सुविधाही चोरटे चोरून नेत असल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली़