बसचालकास मारहाण बॅज तोडून नुकसान
By Admin | Updated: April 12, 2017 00:15 IST2017-04-12T00:15:21+5:302017-04-12T00:15:21+5:30
दोंडाईच्यात नोंद : शहादा रोडवरील घटना

बसचालकास मारहाण बॅज तोडून नुकसान
धुळे : बसचालकासशिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना दोंडाईचा- शहादा रोडवर घडली़ यात बसचालकाचा बॅजही तोडण्यात आला़ या घटनेची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात झाली़
एमएच 39-आर 7262 या क्रमांकाची मोटारसायकल शहाद्याकडून दोंडाईच्याकडे येत होती़ या मोटारसायकलच्या समोर जाणा:या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना समोरून बस येत होती़ वेगात येणारी मोटारसायकल पाहून बसचा वेग कमी करून ती थांबविण्यात आली़ त्यानंतर मोटारसायकलस्वार आणि बसचालक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल़े यात बसचालकाची कॉलर ओढण्यात आली़ यात त्याचा बॅज तुटला़ शिवाय हाताबुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात येऊन शासकीय कामात अडथळा आणण्यात आला़ शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली़ ही घटना 10 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोंडाईचा-शहादा रोडवर टाकरखेडा गावाजवळ घडली़
याप्रकरणी शहादा डेपोचे बसचालक शेख रफीक शेख अब्दुल नबी (37) (रा़ गरीब कॉलनी, शहादा) यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ मोटारसायकलस्वाराविरुद्ध 10 एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास भादंवि कलम 353, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े