न्याय हक्काची जाणीव करुन देण्यासाठी संविधानाच्या प्रतींचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:34 IST2019-11-26T12:34:20+5:302019-11-26T12:34:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात संविधानातील न्यायहक्कांची माहिती सामान्यातील सामान्य माणसार्पयत पोहोचावी यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त ...

न्याय हक्काची जाणीव करुन देण्यासाठी संविधानाच्या प्रतींचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात संविधानातील न्यायहक्कांची माहिती सामान्यातील सामान्य माणसार्पयत पोहोचावी यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे अजय खर्डे हे प्रयत्नशील आहेत़ यांतर्गत त्यांनी जिल्ह्यात राज्यघटनेच्या दोन हजार प्रती मोफत देण्याचे नियोजन केले आह़े
प्रशासकीय अधिकारी अजय खर्डे यांच्याकडून वाटप केल्या जाणा:या या संविधानाच्या प्रती जिल्ह्यातील शाळा, आश्रमशाळा, अभ्यासिका यासह सामाजिक संस्था होतकरु युवकांच्या गटांना देण्यात येणार आहेत़ यातून त्याचे वाचन करणा:या प्रत्येकाला राज्य घटनेतील हक्क आणि कायदे समजून येऊन ‘लोकशाही’ समजून येणार असल्याची अपेक्षा अजय खर्डे यांनी व्यक्त केली आह़े येत्या काही दिवसात पुणे येथून त्यांनी मागणी केलेल्या संविधानाच्या इंग्रजी आणि मराठी भाषेतील प्रती दाखल झाल्यानंतर नियोजनानुसार त्यांचे वाटप होणार आह़े
यांतर्गत रविवारी नंदुरबार शहरात ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन अर्थात टीटीएसएफ कडून युवकांचा मेळावा घेण्यात आला़ या मेळाव्यात 1 हजार विद्याथ्र्यानी उभे राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचे एकमुखाने वाचन केल़े अनिता अजरुन पटले यांनी विद्याथ्र्याकडून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन घेतल़े संविधान दिनाच्या दोन दिवस आधीच संविधानाचा जागर करुन युवकांना देशाची राज्यघटना आणि तिची भूमिका समजावून देण्याच्या या प्रयत्नाने सर्व आनंद व्यक्त करण्यात येत आह़े या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, त्यांच्या मातोश्री कमलबाई भारुड, पुणे येथील युनिक अॅकडमीचे तुकाराम जाधव, टीटीएसएफचे संस्थापक अजय खर्डे, शिक्षणाधिकारी मनीष पवार, सहायक कर आयुक्त समाधान महाजन, निवृत्त वनाधिकारी नामदेव पटले उपस्थित होत़े
पुणे येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून वर्षभर संविधानाची माहिती राज्यभर पोहोचवली जात़े यात संविधान प्रास्ताविक आणि राज्यघटनेच्या प्रती नाममात्र दरात उपलब्ध करुन दिल्या जातात़ यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत़े 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत़ दरम्यान जिल्ह्यात या व्यतिरिक्त दोन हजार संविधान उद्देशिकांचे वाटप करण्यात येणार आह़े विविध संघटनांनी बार्टीकडून त्या मागवून घेतल्या आहेत़ तसेच संविधान साक्षर गाव योजनेंतर्गत पातोंडा ता़ नंदुरबार आणि नवलपूर ता़ शहादा येथे शाळा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय येथे संविधानाच्या प्रती आणि उद्देशिकांचे वाटप होणार आह़े प्रतींद्वारे ग्रामस्थांना राज्यघटनेतील तरतूदी व कायद्यांच्या विषयी माहिती देऊन संविधान साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाईल़